टोरंट पॉवरच्या विरोधात एक अक्षर ही न काढणाऱ्या कपिल पाटील यांचे लागेबांधे काय ?

अंजूरफाटा - चींचोटी रस्ता दुरुस्तीचे 48 कोटी रुपयांचे काय झाले....?

जनदूत टिम    07-May-2024
Total Views |
टोरंट पॉवरच्या विरोधात एक अक्षर ही न काढणाऱ्या कपिल पाटील यांचे लागेबांधे काय ?

अंजूरफाटा - चींचोटी रस्ता दुरुस्तीचे 48 कोटी रुपयांचे काय झाले....?
 
Jandut टीम
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. यामध्ये भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण खरे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अर्धे मतदार हे भिवंडी तालुक्यात राहणारे आहेत आणि सद्यस्थितीत भिवंडीतील अत्यंत महत्त्वाचा एक विषय म्हणजे टोरेंटो पॉवर जनतेमध्ये टोरंटो पावर बाबत प्रचंड संतप्त भावना आहे आणि तेवढीच संतप्त भावना ही राजकीय पुढारी नेत्यांबद्दल आहे.

kapil patil
 
भिवंडी तालुक्यात टोरंटो कंपनीने अक्षरशः लूट चालवली आहे. येणारी बिले न भरल्यानंतर होणारी कारवाई त्यावर केली जाणारी दडपशाही आणि दडपशाहीला राजकीय पुढार्‍यांचा असलेला वरदहस्त अशा पद्धतीने सध्या टोरेंटो पॉवरची कार्यपद्धती सुरू आहे, त्या अनुषंगाने ्या काही राजकीय पुढार्‍यांनी टोऱ्यांटो पॉवरच्या विरोधात सहभाग घेतला त्या नेत्यांबाबत जनतेच्या मनात सदभावना आहेत. परंतु पॉवरच्या विरोधात एक अक्षर ही न काढणाऱ्या कपिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांच्या बद्दल जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे की नाही हे सांगता येणार नाही परंतु पॉवर कडून होणारी दडपशाही कमी करण्याचा प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक होते.

अंजूर फाटा
 
भिवंडी मध्ये टोरंटो पॉवरच्या विरोधात अनेक मोर्चे उत्स्फूर्तपणे निघाले सर्वसामान्य जनता या मोर्चांमध्ये सहभागी होऊन मोर्चे यशस्वी केले मात्र या सर्व प्रकारांमध्ये खासदार कपिल पाटील यांनी जनतेच्या भावना समजून घेतल्या नाहीत किंवा टोरंटो पॉवरच्या विरोधामध्ये जनतेला सहकार्य केले नाही. याउलट टोरंटो पॉवरची बाजू घेऊनच त्यांनी वक्तव्य केले केंद्रात आणि राज्यात सद्यस्थितीत भाजप सरकार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील यांच्या बद्दल टोरंटो प्रकरणावरून जनतेत संताप निर्माण झाला आहे यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कपिल पाटील आणि गृहमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप घनिष्ठ सबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी टोरंटो पॉवर बद्दल विधानसभेत दिलेल्या उत्तरा मुळेही जनतेच्या भावना प्रचंड प्रमाणात भडकल्या होत्या या सर्व परिस्थितीचा विचार केला तर भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या मतदानावर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे
.
त्रास झालेली सर्वसामान्य जनता टोरंटो पॉवरला अभय देणाऱ्या कपिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांना निश्चितच मतदान करणार नाही. या अनुषंगाने ग्रामीण जनतेवर आणि शहरी जनतेवर ही खूप मोठ्या प्रकारचे गुन्हे नोंदवले गेले आहेत बिल आकारणी मध्ये असलेल्या गडबडी कोणा मुळे हे सर्वसामान्य जनतेला आवाच्या सव्वा दराने बिले भरावी लागली आहेत. दंडात्मक कारवाई करताना खूप मोठ्या प्रमाणात अन्याय केला गेला आहे. ही बाब मत पेट्यांमधून निश्चितच बाहेर पडेल याचा फटका कपिल पाटील यांना बसल्याशिवाय राहणार नाही. खरे तर जनता उघडपणे बोलण्यास कधी तयार होत नाही परंतु भिवंडी लोकसभा मतदारसंघात सद्यस्थितीत अशा घटनांवर उघडपणे चर्चा सुरू आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे असे म्हणावे लागेल.

Road
 
मतदानावर परिणाम टाकणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पायाभूत सुविधा भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधा अर्थात रस्ते यांची स्थिती अत्यंत बिकट आहे मागील बारा वर्षापासून भिवंडी वाडा म्हणून आणि भिवंडी कामांची या रस्त्यांची ती अत्यंत खराब आहे विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांवर टोल वसूल केला जात असताना देखील रस्त्यांची स्थिती सुधारली जात नाही. मागील वर्षभरापर्यंत अंजुर फाटा काल्हेर कापूरबावडी ह्या रस्त्याची स्थिती देखील त्याच पद्धतीची झाली होती. जोपर्यंत या परिसरात असलेली गोडाऊन बंद होत नव्हती तोपर्यंत या परिसरातील रस्ते बनविले जात नव्हते.
 
आता गोडाऊन बंद झाल्यामुळे बंद गोडाऊनच्या जागांवर रेसिडेंटल बांधकाम करण्यासाठी वापर करणे शक्य झाले आहे. याचा फायदा घेण्यासाठीच कपिल पाटील आणि शिवसेना यांनी ह्या परिसरातील रस्ता बनवला अशा स्वरूपाची चर्चा जनता करत आहे तर मागील बारा वर्षापासून अँजुर फाटा कामांची हा टोल रस्ता भारतातील सर्वात खराब रस्ता म्हणून गणला जात आहे.
 
तब्बल 2012 पासून प्रवास करणे योग्य नाही अशी टिपणी या रस्त्याबाबत केली जात आहे, मात्र तरीही खासदारकीच्या दहा वर्षात कपिल पाटील यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न केले नाहीत आता निवडणूक जाहीर होण्याआधी डिसेंबरमधील अधिवेशनात महाराष्ट्र शासनाने या रस्त्याच्या डागडुजी साठी 48 कोटी रुपये मंजूर केले परंतु त्या 48 कोटी रुपयांचे काय झाले याची देखील माहिती उजेडात येत नाही याबाबत चर्चा करताना सर्वसामान्य जनता असे सहजपणे बोलून जाते की ती 48 मंजूर करून तिने काढून हडप करण्यात आले आहेत आणि आत्ता या रस्त्यासाठी 322 कोटी रुपयांच्या निधीचे गाजर जनतेला दाखवले जात आहे ते केवळ निवडणुकीपुरतेच आहे. असे म्हटले जात आहे.
 
खरे तर निवडणूक जाहीर होण्याआधी महिनाभर या रस्त्यावरील टोल नाका बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरील विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणातील आंदोलने करण्यात आली परंतु त्यावेळीही कपिल पाटील यांनी ना आंदोलकांची बाजू घेतली ना रस्त्याबाबत कारवाई करण्याची आश्वासन दिले ही सर्व बाब जनतेला नक्कीच खटकत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतात असा एकमेव रस्ता किंवा टोलनाका आहे ज्यावर फास्टट्रॅक घेतले जात नाही. जर भारतातील इतर कोणत्याही रस्त्यावर फास्ट ट्रॅक नसेल तर दुप्पट टोलाकारणी केली जाते असे असताना अंजीर फाटा कामांची या रस्त्यावर फास्टट्रॅक का नव्हते याबाबत स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती.
 
जी परिस्थिती चिंचोटी कामण अंजूर फाटा रस्त्याची होती तीच परिस्थिती भिवंडी वाडा मनोर या रस्त्याची देखील होती मागील दहा वर्षात या रस्त्याबाबत देखील कपिल पाटील यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत निवडणुकीत आपला पराभव निश्चितच आहे ही बाब लक्षात आल्यानंतर सारवा सारव करण्यासाठी या रस्त्या करिता देखील निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करण्यासाठी केलेल्या पत्रात कपिल पाटील यांनी हे रस्ते अत्यंत खराब असल्याचे लिहिले होते जर हे रस्ते अत्यंत खराब आहेत तर मागील दहा वर्षात ते कपिल पाटील यांना दिसले नव्हते का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे. स्पष्टच सांगायचे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपाची होती आणि आहे. मात्र खासदारकीच्या दहा वर्षात कपिल पाटील यांनी सुधारविण्याकरता कोणतेही प्रयत्न केले नाहीत असा आरोप जनतेमधून व्यक्त केला जातो.
 
2014 ला खासदार होण्याआधी मागील दहा वर्ष कपिल पाटील ठाणे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांवर कार्यरत होते ती पदे देखील जिल्हा परिषदेतील अत्यंत महत्त्वाची पदे होती त्या पदांच्या आधारे ग्रामीण भागातील रस्ते आणि इतर सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने देणे हे कार्य हे सहज करू शकले असते परंतु त्यांनी मागील दहा वर्षी राजकारण करण्यापलीकडे काहीही केले नाही. या सर्व गोष्टीचा विचार जनता पुन्हा पुन्हा करू लागले आहे खरे तर 2014 आणि 2019 या निवडणुकीत कपिल पाटील यांना लोकांनी काही अपेक्षा ठेवूनच मतदान केले होते त्या अपेक्षा कोणत्याही अर्थाने पूर्ण झाल्या नाहीत हे पुन्हा पुन्हा सांगावे लागत आहेत कारण जनताच त्याबाबत पुन्हा पुन्हा चर्चा करताना दिसत आहे.