घर चार पुल दोन ठेकेदारांना पोसतोय कोण ?
मुरबाड दि ७ मुरबाड तालुक्यात सा बा विभाग हा सार्वजनिक चराऊ कुरण बनले असून विभागातुन रस्त्याच्या नावे ठेकेदारी विकास सुरू असल्याच्या शेकडो तक्रारी जिल्हा स्थरावर मंत्रालय स्थरावर पडून आहेत गवळेश्वदेवस्थान सारखे देवाच्यानावाने देखील घपला केला जात असून पर्यटश्रेत्र विकास कामे गणेशघाट बांधण्या सारख्या कामात गौडबंगाल केला जात आहे मात्र प-हे गावालगतच्या चार घरा साठी एकाच नाल्यावर एकाच रस्त्याला दोन ठिकाणी बांधलेली दोन साकाव पुल पाहता साबा विभाग व येथील इंजिनियर यांच्या बुद्धीची किव करविशी वाटते.
सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड यांच्या माध्यमातून गृपग्रामपंचायत पऱ्हेच्या हद्दीतील पऱ्हे गावापासुन १ कि.मी अंतरावर असलेल्या माथेरानपाडा या चार घर असलेल्या वस्तीसाठी जा - ये करण्यासाठी एका नाल्यावर दोन तीन वर्षा पुर्वी १६ लाख ५० हजार रूपयांचा निधी खर्च करुन साकाव पुल बांधण्यात आला होता. हा साकाव सुस्थितीत असताना पुन्हा त्याच साकावा लगत सन २०२४-२५ या चालु वर्षामध्ये दुसरा साकाव पुल लाखो रूपये खर्च करुन साबा विभागाकडून बांधकाम अंतिम टप्प्यात बांधकाम चालु आहे.यावरून शासनाच्या निधीचा कुठेतरी गैरवापर करून शासनाचीच लुट करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप अदिवासी क्रांतीसेना संघटना उपाध्यक्ष बाळा दळवी यांनी केला आहे. तसेच या कामाची य सखोल व गांभीर्यपूर्वक चौकशी करुन अधिकाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची मागणी संघटने तर्फे करण्यांत येत आहे,