महिलांसाठी 23 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जनदूत टिम    23-Jul-2024
Total Views |

ठाणे : ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व जिल्हा औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची), ठाणे / बेलापूर) तसेच लाईट हाऊस, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.23 जुलै 2024 रोजी जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त,श्रीमती संध्या साळुंखे यांनी आहे.

या मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, पदवीधर, आय.टी.आय या शैक्षणिक पात्र महिला उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तरी सर्व नोकरी इच्छूक महिला उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त, श्रीमती संध्या साळुंखे यांनी केले आहे.