निसर्ग वाचला तरच माणूस जगेल:- उद्यान पंडित बबन हरणे यांचे प्रतिपादन

13 Jan 2025 11:09:29
 
आज सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात हवामान दूषित होत आहे,जंगले जळतात ,झाडे तोड होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये उत्पन्न देखील घटत असल्याने निसर्ग वाचला ,जंगल वाढले तरच माणूस जगेल असे प्रतिपादन उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी केले,आदिवासी आश्रमशाळा गांडूळवाड येथील पडीक जागेत वृक्षारोपण कार्यक्रमात बबन हरणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, जंगलापासून विविध औषधी वनस्पती, फळे,फुले मिळतात त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या पिकांसाठी जी महत्वपूर्ण गरज आहे ती मधमाशी देखील जंगल वाढले तरच टिकेल नाहीत भविष्यात आपल्याला अन्नधान्य टंचाई ला सामोरे जावे लागेल,त्यामुळे झाडे लावणे गरजेचे आहेच पण ती जगवली पाहिजेत आणि राखली देखील पाहिजेत,वृक्षतोड करून आपणच आपले नुकसान करत आहोत ,आपल्या पिढ्या वाचविण्यासाठी तरी झाडे वाचवा असे आवाहन हरणे यांनी केले, यावेळी बबन हरणे यांनी स्वखर्चाने 2 हजार झाडे उपलब्ध करून देऊन स्वतः लागवड करून दिली त्याबद्दल अश्रमशाळेचे मुख्याध्यापक मेनेसर आणि संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भांगरथसर यांच्या हस्ते बबन हरणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला ,या कार्यक्रमास पत्रकार राजेश जागरे, जयराम चौधरी, रमेश हरणे,पुंडलिक घोडविंदे,काशिनाथ हरणे, गणेश उमवणे, रवींद्र दलाल ,सतीश पडवळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
baban harne
baban harne
baban harne
 सामाजिक बांधिलकी म्हणून तालुक्यात विविध उपक्रम राबविणारे कार्यकर्ते व उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी बबन हरणे यांच्या मार्फत ठिले हायस्कूल येथे जागतिक वनदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले, झाडे टिकली तरच माणूस टिकू शकतो व पर्यावरण संतुलित राहू शकते यासाठी शहापूर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणारे बबन हरणे यांनी ठिले हायस्कूल मध्ये स्वखर्चाने 200 कदंब, बकुळ, ताम्हण, काशीद,वड ,पिंपळ,कडनिमं,बकायन निम, बहावा ,आपटा,अर्जुन आदी विविध जंगली झाडे व औषधी झाडे आणून लागवड करून दिली ,यावेळी शाळेतील मुलांना वनाचे महत्त्व आणि झाडांची ओळख करून देण्यात आली,शिवाय दरवर्षी आपण असा झाडे लागवड उपक्रम करत असून 5000 झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प बबन हरणे यांनी केल्याचे सांगितले, या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक पाटीलसर ,टेम्भरे गावचे उपसरपंच विशाल विशे, जगदीश सातपुते, तानाजी हरणे, मिथुन धोबी, काळू गिरा, हरीचंद्र पाटोळे, व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0