एसटी भाडेवाडीनंतर राज्यातील महामार्गावरील टोल टॅक्स वाढणार

24 Jan 2025 16:34:13
एसटी भाडेवाडीनंतर राज्यातील महामार्गावरील टोल टॅक्स वाढणार
मुंबई (मिलिंद माने) राज्यातील महाराष्ट्र राज्य एसटी महामार्ग परिवहन महामंडळाने१४.९५ टक्के एसटीच्या प्रवासी भाड्यात वाढ केल्यानंतर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील टोल टॅक्स मध्ये देखील पाच ते दहा रुपयांची भाडेवाढ एक एप्रिल पासून होणार असल्याने याचा फटका मालवाहतूकदार व खाजगी प्रवासी वाहनांना बसणार आहे
राज्यातील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कार साठी (एकेरी वाहतूक) ७५ रुपये, टेम्पो साठी११५ रुपये, सहा टायर वाहनांसाठी२४५ रुपये, दहा पेक्षा अधिक टायरांच्या वाहनासाठी३९५ रुपयांचा टोल भरावा लागतो
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग परिवहन विभागाने आजपासून१४. ९५ टक्के प्रवासी भाडेवाढ केली आहे या भाडेवाडीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला नाहक कात्री पडणार आहे एस टी महामंडळाच्या भाडेवाडी पाठोपाठ रिक्षा व प्रवासी टॅक्सी मध्ये देखील भाडेवाढ केली आहे या भाडेवाडीनंतर केंद्राच्या व राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यातील नागरिकांना दिलासा मिळतो का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यानंतर एक एप्रिल पासून राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील खाजगीकरणातून उभारण्यात आलेल्या रस्त्यावरील टोल नाक्यावर पाच ते दहा रुपयांची टोल भाड्यामध्ये वाढ केली जाणार आहे
राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग जे खाजगीकरणा मधून बनविण्यात आले आहेत या रस्त्यावरील टोल टॅक्स दरवर्षी वाढविला जातो केंद्र सरकारच्या वाहतूक विभागाकडून कोणत्या महामार्गावरून किती वाहने दररोज ये -जा करतात त्या महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी किती खर्च करावा लागतो तसेच त्यामध्ये अजून कोणत्या उपाययोजनांची गरज आहे व त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे या बाबींचा विचार करून महामार्गावरील टोल टॅक्स मध्ये वाढ केली जाते
राज्यातील मुंबई पुणे दृत गती महामार्ग या महामार्गावर एकेरी टोल देण्याची प्रथा आहे तर काही महामार्गावर रिटर्न टोल करण्याची सुविधा उपलब्ध आहे यानुसार २४तासात ये- जा करण्यासाठी कार साठी११० रुपये, टेम्पो साठी१८० रुपये, सहा टायर ट्रक साठी३७० रुपये, दहाहून अधिक टायरच्या वाहनासाठी५९० रुपये अशी टोल आकारणी केली जाते
सध्या मुंबईतील सर्वच टोलनाक्यांवर मुंबई येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी कार वाहतुकीसाठी टोल फ्री करण्यात आला आहे केवळ अटल सेतू वर वाहनांना टोल आकारणी केली जाते त्याचप्रमाणे सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जातो त्या रायगड ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात सध्या कोणत्याच रस्त्यावर टोल आकारणी होत नाही मात्र पुढील वर्षापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारपाडा ,सुकेळी खिंड, पोलादपूर जवळील चां ढवे तसेच चिपळूण जवळी लवेल फाटा, व रत्नागिरी पासून राजापूर सिंधुदुर्ग पर्यंत या ठिकाणी टोल नाके मुंबई व राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर चालू होणार आहे सध्या ठाणे जिल्ह्यातील पडघा तसेच वाडा मनोर व मुंबई अहमदाबाद मार्गावर टोल वसूल केला जातो
एकंदरीत राज्य सरकारने एसटी भाडेवाडी बरोबर खाजगी रिक्षा व प्रवासी टॅक्सी केल्यानंतर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील खाजगीकरणातून उभारण्यात आलेल्या रस्त्यांवर देखील १ एप्रिल पासून पाच ते दहा रुपयांची भाडेवाढ होणार आहे
Powered By Sangraha 9.0