आपल्या कर्तृत्वाने आपली गुणवत्ता दाखवा -सिने अभिनेता पंढरीनाथ कांबळे

30 Jan 2025 09:37:25
आपल्या कर्तृत्वाने आपली गुणवत्ता दाखवा -
सिने अभिनेता पंढरीनाथ कांबळे
वासिंद प्रतिनिधी
 
पंढरीनाथ कांबळे
आपल्या स्वकर्तुत्वाने,व गुणवत्तेने तुम्ही मोठं व्हा,आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करा.मग तुम्हाला लोकं ओळखू लागतील तुमची गुणवत्ता म्हणजेच तुमची उंची
आहे.असे उद्गागार सुप्रसिध्द मराठी अभिनेते,बिग बॉस फेम पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी यांनी वासिंद येथे काढले.
वासिंद येथील सरस्वती विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते पंढरी कांबळे उपस्थित होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला ते म्हणाले मी म्यून्सिपल शाळेत शिकलो आहे.मला त्यावेळी एका सामाजिक संस्थेकडून पाटय पुस्तक, व गणवेश मिळत होते.आणि अशा परिस्थितीत मी मोठ्या कष्टाने शिकलो आणि शिक्षण पुर्ण केले.अशी शालेय आठवणं सांगताना पॅडी म्हणाला मी कॉलेजमध्ये असताना मला पाचशे रुपयाची शिष्यवृत्ती मिळाली होती.त्या शिष्यवृत्तीतून मिळालेल्या पैशाचं मोलं व महत्त्व मला आजही आहे.अशा आठवणी त्यानं जागविल्या कॉलेज जीवनातील आठवणी ताज्या करताना तो म्हणाला माझ्या कॉलेज मित्रांनीच मला पंढरीचा पॅडी केला.आणि या टोपणनावाने ओळख मिळालेल्या पॅडीला पुढे महाराष्ट्रात चित्रपट सृष्टीत एक कलाकार म्हणून ओळख मिळाली.आज मी कलाकार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे.असं सांगताना तो पुढे म्हणाला मला शाळेत किंवा कॉलेज मध्ये असताना एकही बक्षीस कधीच मिळालं नाही अशी खंत त्याने व्यक्त केली.मला जरी बक्षीस जरी मिळालं नसलं तरीपण आज माझ्याकडून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचं भाग्य मला लाभलं आहे.यात मला मनापासून खूप आनंद वाटतो आहे.असे भावनिक उद्गार त्याने काढले.आज ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळत आहेत त्यांच खरंच मनापासून कौतुक करतो असचं तुम्ही पुढे जात राहा शाळेचं आणि आपल्या आई,वडिलांचं नाव मोठं करा अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो असं शेवटी पॅडी आपल्या भाषणात म्हणाला.या सोहळ्यात सरस्वती विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी तसेच क्रिडा स्पर्धांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यालयातील निवृत्त शिक्षकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला.या सोहळ्यासाठी सरस्वती विद्यालयाच चेअरमन लडकू पवार,सेक्रेटरी रविंद्र शेलार, वासिंद ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र म्हस्कर तसेच सर्व संचालक मंडळ व विद्यालयाचे प्राचार्य एम.ए.कांबळे,सचिन भोईर,मुकेश दामोदरे, नामदेव जाधव,किसन
निचिते,कुमावत,काबाडी,एस.जी.भोईर के.एन.धनगर व्ही.टी.भोईर,या शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.यावेळी सरस्वती विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी वृंद व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0