मा. राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांची आ सत्यजित तांबे यांनी भेट

08 Jan 2025 10:15:09
मा. राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांची आ सत्यजित तांबे यांनी भेट घेऊन महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये प्रचलित असलेल्या विविध गंभीर समस्यांवर चर्चा केली आणि त्या समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी निवेदन सादर केले.

Rajyapal
📌राज्यातील अनेक प्राध्यापक पदे रिक्त असून, त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. प्राध्यापकांची भरती थेट विद्यापीठ स्तरावर करण्यात यावी.
📌कोविड-19 महामारीमुळे शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले असून, अद्यापही शैक्षणिक चक्र सुरळीत झालेले नाही. प्रवेश प्रक्रिया उशिरा पूर्ण होणे, परीक्षा वेळापत्रकाची घाई, आणि निकाल विलंब यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे.
📌वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जातात किंवा रद्द होतात. परिणामी, विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रम प्रवेश आणि शैक्षणिक नियोजनावर विपरीत परिणाम होतो.
📌 पेपर फुटीच्या घटना वारंवार घडत असून, यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. या समस्येवर कठोर कायदा करून शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करणे गरजेचे आहे.
📌राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, वाचनालय, क्रीडांगण यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या सुविधांची तातडीने उपलब्धता सुनिश्चित केली जावी.
📌राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतरही अपेक्षित बदल शैक्षणिक प्रक्रियेत होत नाहीत. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून, वरील समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे. राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत अशी विनंती माननीय राज्यपाल महोदयांना केली.
Today, I met Hon. Governor Shri C. P. Radhakrishnan to discuss critical issues Maharashtra's universities are grappled with !
Vacant teaching posts, disrupted academic cycles, frequent exam delays, paper leaks, lack of basic infrastructure, and ineffective implementation of the National Education Policy.
I requested an action to resolve these issues for the betterment of the education system.
#education #teachers #infrastructure #futuregenerations
Powered By Sangraha 9.0