चिकू फेस्टिवल : शेती, संस्कृती आणि पर्यटनाचा अनोखा मिलाफ.. ग्रामीण विकासाची अद्वितीय संधी!

08 Feb 2025 14:36:05
चिकू फेस्टिवल : शेती, संस्कृती आणि पर्यटनाचा अनोखा मिलाफ.. ग्रामीण विकासाची अद्वितीय संधी!

bordi
bordi
bordi
bordi
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे आजपासून २ दिवसीय 'चिकू महोत्सव २०२५' ला उत्साहात सुरुवात झाली, या कार्यक्रमाचे उद्घाटन केले..
रूरल एंटरप्रुनर्स वेल्फेअर फाउंडेशन (REWF) यांच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे यंदा ११ वे वर्ष आहे. शेती, उद्योग आणि संस्कृती यांचा पर्यटनाशी मेळ घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी या महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे.
या महोत्सवात चिकू आणि त्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ, पारंपरिक वारली चित्रकला तसेच स्थानिक ग्रामीण संस्कृतीचा अद्वितीय अनुभव मिळत आहे. स्थानिक शेतकरी, उद्योजक आणि कलाकारांना त्यांच्या उत्पादनांचे सादरीकरण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून चिकू उत्पादकांना बाजारपेठ मिळण्याबरोबरच ग्रामीण पर्यटनाचा मोठा विकास होण्यास मदत होणार आहे.
यावेळी आमदार श्री.विनोद निकले, खासदार श्री.राजेंद्र गावित, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संदीप राऊत, उद्घाटक सौ.शारदा पाटील, फेस्टिव्हल अध्यक्ष श्री.उदय चुरी, सरपंच श्री.श्याम दुबळा, श्री.नरेश राऊत, पर्यटन विभागाचे सहसंचालक श्री.हनुमंत हेडे, श्री.एन.के.पाटील, श्री.प्रभाकर सावे व मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0